कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक | पुढारी

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास संस्था सीबीआयने कॉर्पोरेट मंत्रालयातील अधिकारी मंजीत सिंह तसेच पुनीत दुग्गल यांच्यासह चार आरोपींना अटक केली आहे. दिल्ली, मुंबई तसेच चेन्नईत झाडाझडती दरम्यान सीबीआयने जवळपास ६० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. आरोपींविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त संचालक मंजीत सिंह, मंत्रालयाचे संयुक्त संचालक पुनीत दुग्गल आणि मंत्रालयातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक रुही अरोडा आणि खासगी संस्था आलोक इंडस्ट्रीच्या असोसिएट रेशमा रायजादा यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील या अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा आरोप असून मंत्रालयाकडून सुरू असलेल्या तपासात पक्षपातपणा करण्याच्या अनुषंगाने खासगी व्यक्तीकडून लाच स्वीकारल्याचा आरोपाखाली सीबीआयाने गुन्हा दाखल केला आहे.

एका प्रकरणात ऋषभ रायजादा पुनीत दुग्गल यांच्या संपर्कात होते. रेशमा रायजादा यांनी अहमदाबाद येथे दुग्गल यांना लाचेची रक्कम पोहचली होती.रुही अरोडा यांनी मंजीत सिंह यांचे या प्रकरणात रेशमा यांना मदत करण्यासाठी मन वळवले होते.पुनीत दुग्गल यांनी २७ जुलै रोजी रुही अरोडा यांना फोन करीत सिंह यांना देण्यात येणारी चार लाखांची रक्कम पोहचल्याचे कळवले होते,असे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button