पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल | पुढारी

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती बिघडली असून त्यांना कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वसनमार्गांचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

“त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही त्याची तपासणी करत आहोत. दुपारी त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

त्यांच्या प्रकृतीवर हृदयरोगतज्ज्ञ आणि पल्मोनोलॉजिस्टसह वरिष्ठ डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. भट्टाचार्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते.

२००० ते २०११ या काळात मुख्यमंत्री राहिलेले भट्टाचार्य गेल्या काही काळापासून सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि इतर वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते.

हेही वाचलंत का?

Back to top button