अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यभर आंदोलन झाल्यानंतर अखेर राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात आज (दि. २९) महापुरुषांच्या अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (Sambhaji Bhide On Mahatma Gandhi)
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने बडनेरा मार्गावरील जय भारत मंगल कार्यालयात गुरुवारी (दि. २७) सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द काढले. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. भिडे यांच्या या विधानाने अमरावती जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडाली. भिडे यांच्या या विधानाचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक करण्याची मागणी देखील विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली. (Sambhaji Bhide On Mahatma Gandhi)
अखेर राजापेठ पोलीस ठाण्यात मंगेश शिंदे यांच्या तक्रारीवरून संभाजी भिडे (रा. सांगली), संस्थापक श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना, निशानसिंह जोध व अविनाश मरकल्ले यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा