तेलंगणा : नरसिंगी येथे बीआरएस नेता आणि मुलाचा कार अपघातात मृत्यू | पुढारी

तेलंगणा : नरसिंगी येथे बीआरएस नेता आणि मुलाचा कार अपघातात मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते थौर्या नायक आणि त्यांचा मुलगा अंकित यांचा शनिवारी कार अपघातात मृत्यू झाला. तेलंगणातील नरसिंगी येथे त्यांच्या कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थौर्या नायक आणि त्यांचा मुलगा अंकित नरसिंगी गावातून चेगुंता येथे जात असताना त्यांच्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावरून रस्त्याच्या विरुद्ध बाजूस पडली. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका लॉरीने कारला धडक दिली. यामध्ये थौर्या नायक आणि त्यांचा मुलगा अंकित यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह रामायणपेठच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button