आईसारखी मुलाची काळजी कोणीही घेवू शकत नाही : उच्‍च न्‍यायालय | पुढारी

आईसारखी मुलाची काळजी कोणीही घेवू शकत नाही : उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आई जशी आपल्‍या मुलाची काळजी घेवू शकते तशी कोणीही घेवू शकत नाही, असे निरीक्षण नाेंदवत केरळ उच्‍च न्‍यायालयाने दिव्‍यांग मुलाचा ताबा आईकडे सोपवला. संबंधित मुलाला ‘इतरांच्या दयेवर’ सोडले जाणार नाही, असेही न्यायमूर्ती पी.बी. सुरेश कुमार आणि न्यायमूर्ती सी.एस. सुधा यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

काय होते प्रकरण ?

याचिकाकर्ता महिला ही मुलाच्‍या जन्‍मापासूनच पतीपासून विभक्‍त राहत होती. दिव्‍यांग असणारे मुलगा हा पतीसोबत राहत होते. त्‍यांनी आपल्‍या दुसरी पत्‍नीला या मुलाचे पालक म्‍हणून नियुक्‍त केले होते.पतीच्‍या मृत्‍यूनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी या दिव्‍यांग मुलाचा ताबा ग्रेस होम चॅरिटेबल सोसायटीकडे दिला. आईला आपल्‍या मुलाला ताब्‍यात घेण्‍यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. मुलाला ग्रेस होम चॅरिटेबल सोसायटीच्‍या ताब्‍यात देण्‍याऐवजी आपल्‍याकडे  देण्‍यात यावे, अशी मागणी करणारी याचिका संबंधित महिलेने केरळ उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती.

दिव्‍यांग मुलाचा ताबा आईकडे देण्‍याचे आदेश

केरळ उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, कलम 14 नूसार अपंग व्यक्तींच्या पालकांच्या त्यांच्या अपंग मुलांची काळजी घेण्याच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही. ते अपात्र ठरले नाहीत. कोर्टाने याचिकाकर्त्याला संबंधित आई मुलाची काळजी घेण्याच्या स्थितीत आहे की नाही, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. आई जशी आपल्‍या मुलाची काळजी घेवू शकते तशी कोणीही घेवू शकत नाही, असे स्‍पष्‍ट करत न्यायमूर्ती पी.बी. सुरेश कुमार आणि न्यायमूर्ती सी.एस. सुधा यांच्‍या खंडपीठाने दिव्‍यांग मुलाचा ताबा आईकडे देण्‍याचे निर्देश दिले.

 

Back to top button