Online Love : लुडो, पबजीनंतर आता ‘इन्‍टा’ लव्‍हस्‍टोरी चर्चेत, पोलंडमधील महिला भारतात… | पुढारी

Online Love : लुडो, पबजीनंतर आता 'इन्‍टा' लव्‍हस्‍टोरी चर्चेत, पोलंडमधील महिला भारतात...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑनलाईन गेमच्‍या माध्‍यमातून भारतीय तरुणांच्‍याा प्रेमात पडलेल्‍या पाकिस्‍तानमधील दोन तरुणींचे प्रकरण ताजे असतानाच, आता झारखंडमधील इन्‍टावरील लव्‍हस्‍टोरीची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. ( Online Love ) इन्‍स्‍ट्राग्रामवर ओळख झालेल्‍या झारखंडमधील तरुणांच्‍या प्रेमात पडलेली पोलंडमधील महिला पर्यटन व्‍हिसावर भारतात आली आहे. सध्‍या नेपाळमार्गे भारतात आलेल्‍या पाकिस्‍तानी तरुणी सीमा हैदरची चर्चा होत असताना झारखंडमधील तरुणांशी लग्‍न करण्‍यासाठी पोलंडमधील महिले हजारीबागमध्‍ये आली आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.

पोलंडमधील ४९ वर्षीय बार्बरा पोलक ही महिला झारखंडच्या हजारीबागमध्ये तिच्या भारतीय प्रियकर शादाब मलिकसोबत राहण्यासाठी भारतात आली आहे. तिने आपल्‍या पहिल्‍या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. बार्बरा आणि शादाब यांची इन्स्टाग्रामवर मैत्री २०२१ मध्ये झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.आता बार्बरा आपल्‍या सहा वर्षांची मुलगी अनन्यासोबत भारतात आली आहे. सध्या ती झारखंडमधील बरतुआ गावात प्रियकर शादाबसोबत राहत आहे. लवकरच बार्बरा शादाबशी लग्‍न करणार असून ती २०२७ पर्यंत वैध असलेल्या पर्यटन व्हिसावर भारतात आली आहे.

मला सेलिब्रिटी असल्‍यासारखे वाटले….

बार्बरा आणि शादाब आता विवाह बंधनात अडकणार आहेत. हजारीबाग उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) न्यायालयात दोघांनी लग्नासाठी अर्ज केला आहे. बार्बरा आणि शादाब यांच्या लग्नाची गावात जोरदार तयारी सुरू आहे. माध्‍यमांशी बोलताना बार्बरा म्हणाली, भारत हा एक सुंदर देश आहे. मी जेव्‍हा प्रथम हजारीबागमध्‍ये आले तेव्हा बरेच लोक मला भेटायला आले. मला सेलिब्रिटी असल्यासारखे वाटले. माझे पोलंडमध्‍ये घर आहे. मी मूळची पोलंडची असून मला येथे चांगली नोकरी होती; शादाब आलमसाठी मी हजारीबागला आले आहे.आम्ही लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहोत.”

Online Love :  विदेशी तरुणीचे ‘ऑनलाईन प्रेम’ चर्चेचा विषय

जानेवारीमध्ये कर्नाटक पोलिसांनी १९ वर्षीय पाकिस्‍तानी तरुणी इकारा जीवनी हिला अटक केली होती. ती बेकायदा बंगळुरमध्‍ये राहत असल्‍याचे चौकशीत निष्‍पन झाले होते. ऑनलाईन गेम लुडो खेळताना मूळचा उत्तर प्रदेशमधील आणि बंगळूरमध्‍ये सुरक्षा रक्षक म्‍हणून काम करणार्‍या मुलायम सिंह यादव याच्‍या प्रेमात पडली. त्‍याच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी ते बेकायदा भारतात आली होती. या प्रकार उघडकीस आल्‍यानंतर तिला विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने तिला पुन्‍हा पाकिस्‍तानमध्‍ये तिच्‍या घरी पाठविण्‍याची व्‍यवस्‍था केली होती. यानंतर नुकतेच पाकिस्‍तानची नागरिक सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्‍हस्‍टोरी देशभरात चर्चेला विषय ठरली आहे. नेपाळमार्गे भारतात आलेल्‍या सीमा हैदर हिची गुप्‍तचर विभागासह उत्तर प्रदेश एटीएसकडूनही चौकशी करण्‍यात आली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button