शिर्डी लोकसभा मतदार संघ आरपीआयसाठी सोडा : रामदास आठवले | पुढारी

शिर्डी लोकसभा मतदार संघ आरपीआयसाठी सोडा : रामदास आठवले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष म्हणून भाजप सोबत युती करून निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी, गुरुवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली. संसदेत नड्डा यांची आठवले यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला रिपब्लिकन पक्षाची देशभर मजबूत साथ आहे. रिपब्लिकन पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. देशभर रिपब्लिकन पक्षाचे संघटन आहे. त्यामुळे देशात उत्तर प्रदेश, तेलंगणा, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, केरळ, गुजरात आदी राज्यांत रिपब्लिकन पक्षाला एनडीएचा घटक पक्ष करावे याबाबत आठवले यांनी नड्डा यांच्याशी चर्चा केली.

Back to top button