Kerala Marriage Story : केरळच्या एका लग्नाची अशीही स्टोरी; मु्स्लिम तरुणांनी उचलली हिंदू वधू-वराच्या लग्नाची जबाबदारी | पुढारी

Kerala Marriage Story : केरळच्या एका लग्नाची अशीही स्टोरी; मु्स्लिम तरुणांनी उचलली हिंदू वधू-वराच्या लग्नाची जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kerala Marriage Story : केरळमध्ये एका सलोख्याची चर्चा होत आहे. केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) या संघटनेच्या युवा समितीने मलप्पूरममधील एका मंदिरात हिंदू वधू-वरांना विवाह करण्यास मदत केली आहे. त्यांच्या या भूमिकेने मानवता आणि एकतेचा आदर्श घालून दिला आहे. केरळमधील मलप्पूरम या जिल्ह्यात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहे. येथे राहणाऱ्या मुस्लिम तरुणांनी वेंगारा येथील श्री अमनचेरी भगवती मंदिरात गीता आणि विष्णूच्या लग्नाचे आयोजन आणि आर्थिक मदत केली. वाचा सामान्य लग्नाची अनोखी गोष्ट… (Kerala)

Kerala Marriage Story : चर्चा होत आहे सलोख्याची 

केरळ राज्यातील मलप्पूरममधील गीता ही पलक्कड येथील रोझ मॅनर शॉर्ट स्टे होममध्ये राहत होती. या ठिकाणी संकटात सापडलेल्या, शोषण, तस्करी आणि वैवाहिक वादांना बळी पडलेल्या महिलांचे पुनर्वसन केले जाते. मुजाहिद एज्युकेशन ट्रस्ट संचलित स्टे होमच्या पर्यवेक्षकाने गीता आणि विष्णु यांच्या विवाहाचे आयोजन केले होते. तर आययूएमएल या युवक संघटनेने लग्नासाठी आर्थिक मदत केली होती. वर विष्णू हा कोझिकोडमधील कुन्नमंगलमचा रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी गीता तिची आई आणि बहीण गिरिजासोबत रोझ मनोरमध्ये राहायला आली होती. यापूर्वी मुस्लिम युवा संघटनेने २०२२ मध्ये गिरिजाच्या लग्नासाठी आर्थिक मदतही केली होती.

या विवाह सोहळ्याला कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यासोबतच आययूएमएलचे नेते पीके कुनहालीकुट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद सादिकाली शिहाब थंगल हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

एकता आणि मैत्रीचे साक्षीदार

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,  “आज मंदिराचे प्रांगण माझ्या भूमीतील एकता आणि मैत्रीचे साक्षीदार आहे. अनुकरण करण्यासाठी हा एक उत्तम संदेश आहे. विष्णू आणि गीता वैवाहिक जीवनात पाऊल ठेवत असताना त्यांना खूप खूप शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by P K Kunhalikutty (@pk.kunhalikutty)

हेही वाचा 

Back to top button