OMG -2 : कपाळावर भस्म, लांब जटा..विश्वास ठेव म्हणत अक्षयच्या चित्रपटाचा टीझर रिलीज | पुढारी

OMG -2 : कपाळावर भस्म, लांब जटा..विश्वास ठेव म्हणत अक्षयच्या चित्रपटाचा टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट OMG 2 चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या काही मिनिटांच्या टीझरमध्ये अक्षय कुमारने भोलेनाथच्या कपाळावर भस्म, लांब केस आणि गळ्यात रुद्राक्षची माळ घालून चाहत्यांना प्रभावित केले आहे. या चित्रपटाच्या टीझरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (OMG -2)

चित्रपटाचा टीझर रिलीज होण्यापूर्वी अक्षय कुमारने चित्रपटाचे अनेक पोस्टर रिलीज केले. ज्यामध्ये त्याच्या लूकने प्रेक्षकांच्या मनात आधीच स्थान निर्माण केले होते. अशा परिस्थितीत चित्रपटाचा हा धमाकेदार टीझर पाहून अक्षय पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे. ओएमजी २ हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ओएमजी चित्रपटाचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसला. तर यावेळी तो भोलेनाथच्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

ओएमजी २ चित्रपटात अक्षय कुमारशिवाय पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच ‘रामायण’ फेम अरुण गोविलही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा सामना सनी देओलच्या ‘गदर २’ सोबत होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Back to top button