राजगुरूनगर ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा पुण्यात खून करण्यात आला आहे. कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याने पुणे शहरात दहशत माजवलेली होती. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमधील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याचा राग होता. या रागातून कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे.
अधिक वाचा :
विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असलेला तडीपार गुंड पप्पू कल्याण वाडेकर अवघ्या २८ वर्षांच्या गुंडाचा खून केल्याने मोठी खळबळ माजली आहे. राजगुरूनगर (ता. खेड, जि.पुणे) येथील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे.
अधिक वाचा :
पप्पू वाडेकरवर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले होते.
अधिक वाचा :
रविवारी (दि ११) रात्री तो आपल्या लहान मुलीला भेटायला राजगुरूनगर परिसरात आला होता.
संशयित आरोपी व त्याच्यात दोनदा जोरदार भांडणे झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी समेट सुद्धा झाल्याची चर्चा आहे.
रविवारी त्याला राजगुरूनगर येथील पाबळ रोड परिसरात त्याला आरोपींनी गाठले. या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धारदार हत्याराने मारहाण करून खून केला.
पोलिस निरीक्षक गुरव अधिक तपास करीत आहेत.
पाहा :
स्मृती मानधनाचे ग्लॅमरस फोटो
[visual_portfolio id="3846"]