जल-वायू मुळे मानवी मेंदू, शरीराच्या आकारात बदल | पुढारी

जल-वायू मुळे मानवी मेंदू, शरीराच्या आकारात बदल

वॉशिंग्टन : जल-वायू मुळे मानवी मेंदू, शरीराच्या आकारात बदल झाल्याचे समोर आले आहे. काळानुरूप प्रत्येक जीवात बदल होत असतो. यास मानवसुद्धा अपवाद नाही. सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत मानवात मोठे बदल झाले आहेत. आधुनिक मानव – ज्याला ‘सेपियन्स’ म्हटले जाते, त्याच्यामध्येही बदल होत आहे.

मात्र, उल्लेखनीय म्हणजे या बदलांवर जास्त ध्यान दिले जात नाही. तरीही शास्त्रज्ञांच्या नजरेतून मात्र ही बाब सुटत नाही. सध्या अनेक शास्त्रज्ञ मानवी शरीरात होत असलेल्या बदलांवर नजर ठेवून आहेत. त्यांच्या मते, सध्या मानवात अनेक बदल होत आहेत.

यामध्ये शरीराचा आकार आणि मेंदूचा समावेश आहे. संशोधकांच्या मते, मानवी शरीरात जे बदल होत आहेत, त्यास आपले जल-वायू (वातावरण) जबाबदार आहे.

‘केम्ब्रिज युनिव्हर्सिटी’ आणि जर्मनीतील ‘ट्यूबिनजेन युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी होमो वंशाच्या सुमारे 300 जीवाश्मांचा अभ्यास केला. तसेच यासंबंधीच्या आकडेवारीला क्लायमेट मॉडेल्सशी जोडून मानवाच्या विकासात जल-वायूच्या भूमिकेचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार मानवी विकासात पर्यावरण, जनसांख्यिकीय, सामाजिक, अन्न आणि तांत्रिक कारणांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. संशोधकांना या संशोधनातून असेही आढळून आले की, होमोसेपियन्समध्ये गेल्या 10 लाख वर्षांत शरीराचा आकार निश्चित करण्यात तापमानाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

होमो वंशाचे जीवाश्म ज्यावेळी जिवंत होते, त्यावेळी त्यांनी कोणत्या प्रकारच्या जल-वायूचा सामना केला, याचाही अभ्यास संशोधकांनी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये असे आढळून आले की, गेल्या 40 लाख वर्षांमध्ये जल-वायूमुळे मानवी शरीरात सातत्याने बदल होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मेंदूचा समावेश करावा लागेल.

Back to top button