छत्तीसगडमधील बालोदमध्ये ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात; ६ जागीच ठार | पुढारी

छत्तीसगडमधील बालोदमध्ये ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात; ६ जागीच ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बालोद येथे एक भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाला ट्रकने धडक दिल्याने एक बालक आणि महिलेसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोदा पुलियाजवळ आज सकाळी ट्रकने पिकअप वाहनाला धडक दिली. या भीषण अपघातात एक बालक आणि पाच महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना बालोदा बाजार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button