Alia Bhatt Met Gala 2024 : आलिया भट्टवरून नजर हटेना! मेट गालामध्ये धमाकेदार एन्ट्री
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या फॅशन चॉईसमुळे नेहमीच चर्चेत राहते. (Alia Bhatt Met Gala 2024) आतादेखील तिने मेट गाला २०२४ मध्ये आपल्या देसी लूकने धुमाकूळ घातला आहे. मेट गालाच्या कार्पेटवर उतरताच आलियाकडे सर्वांची नजर खिळून राहिली. मिंट ग्रीन कलरची साडी नेसून मेट गालामध्ये तिने धमाकेदार एन्ट्री घेतली. मेट गालामधून आलिया भट्टचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोक तिच्या ट्रॅडिशनल लूकचे कौतुक करत आहेत. (Alia Bhatt Met Gala 2024)
आलिया भट्टने मिंट ग्रीन कलरची साडी नेसून रॅम्प वॉक केला. ही साडी सब्यसाचीने डिझाईन केली आहे. तिने आपल्या देसी लूकने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आलियाने स्टेटमेंट ज्वेलरी आणि क्लासिक हेअरस्टाईलने आपला लूक कंप्लीट केला आहे. तिच्या पारंपरिक लूकची जगभरात चर्चा होत आहे.
अशी तयार करण्यात आली साडी
१६३ कारागिरांनी आलिया भट्टची ही खास साडी १९६५ तासांमध्ये तयार केली आहे. त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी आहे. फ्लोरल मोटिफ वर्क साडीमध्ये ती आणखी सुंदर दिसत होती. साडी लॉन्ग ट्रेल ॲटॅच्ड आहे, या तिच्या या लूकने चारचाँद लावले.
alia bhatt wearing a custom saree for the met gala 2024 — it is detailed with florals delicately hand embroidered! She looks absolutely stunning🔥 #metgala #AliaBhattpic.twitter.com/BMebXOsRUz
— Tehseen Altaf (@Inzeen12) May 7, 2024
View this post on Instagram
अधिक वाचा –