भिंद्रनवाले ‘पार्ट 2’ वर सरकारचा तगडा पहारा | पुढारी

भिंद्रनवाले ‘पार्ट 2’ वर सरकारचा तगडा पहारा

दिब्रुगड/अमृतसर : 

  • 1980 च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍या दहशतवादाने पंजाब पोळून निघाला होता.
  • खलिस्तानवाद्यांकडून हिंदूंची हत्याकांडे नित्याची बनली होती.
  • तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात लष्कर घालून दहशतवाद्यांचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा खात्मा केला होता.
  • अमृतपाल हा याच भिंद्रनवालेचा भक्त आहे. भिंद्रनवालेच्याच रोडे गावातील भिंद्रनवालेच्याच गुरुद्वारा साहिबमध्ये अमृतपाल लपलेला होता. त्याला आता दिब्रुगड कारागृहात ठेवले आहे.
  • दिब्रुगड कारागृहात बाकीचे साथीदारही आहेत. फुटीरवादाचा हा आजार बळावू नये म्हणून सर्वांवर रासुकाअंतर्गत कारवाई केलेली आहेच, त्यासह दिब्रुगड कारागृहात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

व्यवस्था, तजवीज अशी…

  • अमृतपाल आणि सर्व साथीदारांना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवले आहे.
  • आयबी, रॉ आणि अन्य गुप्तचर यंत्रणांचे चमू दिब्रुगडमध्ये अमृतपालवर नजर ठेवतील.

सुरक्षा व्यवस्था… आकडे बोलतात

  • 57  सीसीटीव्ही कॅमेरे दिब्रुगड कारागृहात…
  • 100 वर कमांडोंचा पहारा कारागृहाबाहेर…
  • 1 सीसीटीव्ही कॅमेरा सतत अमृतपालवर…
  • 10 वर हायमास्ट दिवे कारागृह व परिसरात…
  • 1859 पासूनचे हे कारागृह सर्वात सुरक्षित…
  • 1957 उठावातील कैदी पुढे येथेच डांबले होते…
  • 680 कैद्यांची या कारागृहाची क्षमता आहे…
  • 430 कैदी सध्या या कारागृहात बंद आहेत…

Back to top button