किरकोळ महागाई निर्देशांक १५ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर | पुढारी

किरकोळ महागाई निर्देशांक १५ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या मार्च महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक (सीपीआय) 5.66 टक्क्यांपर्यंत खाली आला असून महागाई दराचा हा मागील 15 महिन्यातील नीचांकी स्तर आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निर्देशांक 6.44 टक्क्यांवर होता. याआधी डिसेंबर 2021 मध्ये महागाई निर्देशांक 5.66 टक्क्यांच्या आसपास होता.

मार्चमध्ये सीपीआय निर्देशांक 5.7 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज अर्थतज्ञांनी वर्तवला होता. मात्र, अंदाजापेक्षाही महागाई कमी झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने म्हटले आहे. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान नियंत्रणात ठेवण्याचे आरबीआयचे लक्ष्य आहे. महागाई दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून रेपो आणि रिव्हर्स रेपो दर स्थिर ठेवले जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात आरबीआयने पतधोरण आढावा बैठकीवेळी रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवले होते. पुढील काही महिन्यांत सीपीआय निर्देशांक 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा आरबीआयने आपल्या अहवालात नमूद केले होते.

हेही वाचा 

Back to top button