अबकारी धोरण बदलात मनिष सिसोदियांची मुख्य भूमिका; ईडीचा युक्तिवाद | पुढारी

अबकारी धोरण बदलात मनिष सिसोदियांची मुख्य भूमिका; ईडीचा युक्तिवाद

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील तथाकथित अबकारी धोरणातील घोटाळ्यासंबंधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी विशेष राऊज एव्हेन्यू न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान षडयंत्र रचने, धोरण बनवणे आणि ते लागू करण्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची मुख्य भूमिका राहिली, असे ईडीने न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.

सिसोदिया मंत्री समुहाचे (जीओएम) प्रमुख होते. मंत्रिमंडळासंबंधी त्यांना संपूर्ण माहिती होती. धोरणात बदल करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. धोरणाचा फायदा पोहचवण्याच्या मोबदल्यात त्यांनी लाच स्वीकारल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. तपास यंत्रणेचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता न्यायालयाने पुढील सुनावणी १८ एप्रिलला ठेवली आहे. पुढील सुनावणीत सिसोदियांच्या वकिलाकडून ईडीच्या युक्तिवादावर बाजू मांडली जाईल.
एका व्यक्तीला केवळ दोन रिटेल परवाने मिळू शकतात. यासाठी लाॅटरी पद्धतीचा अवलंब केला जाणे आवश्यक होते. सर्व झोनमध्ये २७ दुकाने होती. धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती जीएमओ अथवा तज्ञ समितीला नव्हती. प्रक्रियेनुसार बदल केले असते. तर यासंदर्भात  माहिती त्यांना मिळाली असती. कुठलेही धोरणा छुप्या मार्गाने बनवली जावू शकत नाही, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आाला.परंतु, सिसोदियांच्या वकिलाने ईडीचा युक्तिवाद खोडून काढला. जे आरोप लावण्यात आले, ज्या अधिकाऱ्यांच्या  बयाणांवर विश्वास ठेवण्यात आला. ते सर्व नायब राज्यपालांच्या नियंत्रणात आहेत. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांचे एसीआर जे मंत्री तसेच मुख्यमंत्री करतात त्यात त्यांना १० पैकी १० गुण देण्यात आले होते, असा युक्तिवाद सिसोदियांच्या वकिलाने केला. तज्ञ समितीच्या सल्ल्यावर अंमल केला असता तर सरकारी दुकानांना अधिक फायदा झाला असता, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला.

ठोक परवाना खासगी विक्रेत्यांना देण्यासंबंधी जीएमओ मध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. ९ फेब्रुवारी २०२१ तसेच त्यानंतर जीओएम बैठकीत ५ % आणि १२ % नफा वाढवण्याचा तसेच मोठ्या कंपन्यांना ठोक परवाना देण्यासंबंधी कुठलीही चर्चा झाली नाही, असा दावा ईडीकडून करण्यात आला.

हेही वाचा

 

Back to top button