मराठा आरक्षणासंदर्भात झाली इन चेंबर सुनावणी | पुढारी

मराठा आरक्षणासंदर्भात झाली इन चेंबर सुनावणी

नवी दिल्ली : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने इन चेंबर सुनावणी घेतली. दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत न्यायालयाचा आदेश समोर आला नसल्याने आरक्षण मुद्द्यावर न्यायालय पुनर्विचार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत मराठा आरक्षण संदर्भात पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारने कोणतीही पावले उचलली नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button