Earthquake in Uttarkashi : उत्तरकाशीमध्ये पुन्हा भूकंप | पुढारी

Earthquake in Uttarkashi : उत्तरकाशीमध्ये पुन्हा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी जिल्हा मुख्यालय आणि परिसरातआज गुरुवारी पहाटे ५.४० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.   या भूकंपाची तीव्रता  तीन रिश्टर स्केलवर होती. त्याचा केंद्रबिंदू उत्तरकाशीतील मांडो जंगलात जमिनीपासून पाच किमी खाली होता. जरी या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या या वारंवार धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ( Earthquake in Uttarkashi )

१९९१ च्या प्रलयंकारी भूकंपाची दुर्दशा झालेल्या जिल्ह्यात मार्च महिन्यापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. ४ मार्चच्या रात्री उशिरा येथे भूकंपाचे तीन धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.5 मोजण्यात आली होती. त्याचे केंद्र भटवाडी तहसील अंतर्गत सिरोरच्या जंगलात होते. यानंतर होळीच्या सणाच्या दिवशी 8 मार्च रोजी सकाळी 10.07 वाजता भूकंपाचे धक्केही जाणवले. ज्याची तीव्रता 2.5 इतकी मोजली गेली. यानंतर 21 मार्च रोजी रात्री 10.20 वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली. ज्याचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतीय प्रदेशात होते.

हेही वाचा 

Back to top button