Foreign Investment : मोठी बातमी! फ्रान्स करणार महाराष्ट्रात ‘5700 कोटीं’ची गुंतवणूक; ‘इतके’ थेट रोजगार निर्माण होणार | पुढारी

Foreign Investment : मोठी बातमी! फ्रान्स करणार महाराष्ट्रात '5700 कोटीं'ची गुंतवणूक; 'इतके' थेट रोजगार निर्माण होणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Foreign Investment :महाराष्ट्रासाठी आज मोठी आनंदाची बातमी आहे. फ्रान्स महाराष्ट्रात 5700 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात थेट 5300 नोकऱ्या निर्माण होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे. इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स (IFCCI) ने आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेत यावर बुधवारी सांयकाळी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

फडणवीस यांनी ट्विटरवर माहिती दिली. फडणवीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारतीय आणि Foreign Investment फ्रेंच कंपन्यांनी महाराष्ट्रात नवीन कारखाने उभारण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आल्या. LOl वर सह्या करण्यात आल्या आहेत. 14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे थेट 5300 नोकऱ्या निर्माण होतील.

फडणवीस यांच्या ट्विटमध्ये दिलेली माहिती,

महाराष्ट्र-फ्रान्स संबंधांसाठी खास दिवस!
भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांनी महाराष्ट्रात नवीन कारखाने उभारण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सामंजस्य करार, LoI सह्या केल्या.
14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात ₹5,700 कोटींची गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे 5,300 थेट नोकऱ्या निर्माण होतील!!!

इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स (IFCCI) ने आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेत आज संध्याकाळी करारांवर स्वाक्षरी करताना पाहिले.
फ्रान्सचे कॉन्सुल जनरल श्री.
@SereCharlet
, IFCCI चे अध्यक्ष सुमित आनंद, महासंचालक पायल कंवर यांच्यासह प्रख्यात उद्योजक, बँकर्स, धोरणकर्ते, उद्योगपती, फ्रान्स आणि भारतातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तसेच ‘महाराष्ट्र भारताच्या 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाचे नेतृत्व करेल का?’ या विषयावर मुख्य भाषण केले.

हे ही वाचा :

पुणे : मिळकतकर सवलतीचा प्रस्ताव रखडला; मत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा कायम

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक जखमी

हनुमान जयंती विशेष : श्रीराम भक्त हनुमान

Back to top button