शेतीसाठी गोमूत्र व शेणाचा वापर वाढवा : नीती आयोग | पुढारी

शेतीसाठी गोमूत्र व शेणाचा वापर वाढवा : नीती आयोग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नीती आयोगाने (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) गोमूत्र व शेणासंदर्भातील आपला अहवाल सरकारला सादर केला असून, शेतीसाठी खत म्हणून शेण आणि गोमूत्र आधारित फॉर्म्युला मोठ्या प्रमाणात वापरला जायला हवा, अशी शिफारस केली आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने नवनव्या समस्या जन्माला येत आहेत. असेही आयोगाने नमूद केले आहे.

पारंपरिक खत उपलब्ध व्हावे म्हणून गोशाळांना आर्थिक अनुदान देऊन मदत करावी, असेही आयोगाने सुचविले आहे. गेली ५० वर्षे आपण रासायनिक खतांचा अमर्याद वापर करत आहोत. माती, अन्न गुणवत्ता, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होत आहे.

पशूधन हे भारतीय शेतीचे वैभव आहे. नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गोशाळांची मोठी मदत शक्य आहे. शेतीची चक्राकार अर्थव्यवस्था त्यामुळे जन्माला येईल.
-रमेशचंद, सदस्य, नीती आयोग

Back to top button