बेरोजगारांना छत्तीसगडमध्ये दरमहा २,५०० रुपये भत्ता | पुढारी

बेरोजगारांना छत्तीसगडमध्ये दरमहा २,५०० रुपये भत्ता

रायपूर, वृत्तसंस्था : शिक्षण असूनही नोकरी नसलेल्या तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा छत्तीसगड सरकारने केली आहे. बेरोजगार तरुणांना महिन्याला २,५०० रुपयांचा भत्ता मिळेल.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्याचा २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर करताना वरीलप्रमाणे घोषणा केली. १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगारांना हा भत्ता मिळेल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे युवक या भत्त्यासाठी पात्र असतील. बघेल यांनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ६,५०० वरून १०,००० रुपये तसेच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ३,५५० वरून ५,००० रुपये केले आहे.

Back to top button