पाच वर्षांत १.९ लाख कोटी सैन्य साहित्याची खरेदी | पुढारी

पाच वर्षांत १.९ लाख कोटी सैन्य साहित्याची खरेदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – भारताने गेल्या पाच वर्षात अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्त्रायल, स्पेनसह इतर देशांकडून १.९ लाख कोटींचे लष्करी उपकरणे तसेच साहित्याची खरेदी केली आहे. भारताने विदेशातून खरेदी केलेल्या लष्करी साहित्यात हेलिकॉप्टर, रॉकेट, बंदुका, असॉल्ट रायफल, विमान रडार, मिसाइल तसेच दारुगोळाचा समावेश आहे.भारताने २०१७-१८ मध्ये लष्करी उपकरणांसाठी २६४ करारांवर हस्ताक्षर केले.यात विदेशी विक्रेत्यांसोबत करण्यात आलेले ८८ करारांचा समावेश असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे.

२०१७-१८ मध्ये ३० हजार ६७७ कोटींचे लष्करी साहित्याची खरेदी करण्यात आली. २०१८-१९ मध्ये ३८ हजार ११६, २०१९-२० मध्ये ४० हजार ३३० कोटी, २०२०-२१ मध्ये ४३ हजार ९१६ कोटी तसेच २०२१-२२ मध्ये ४० हजार ८४० कोटींचे सैन्य उपकरणे, साहित्य खरेदी करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ तसेच ‘मेक इन इंडिया’ वर लक्ष केंद्रित केले आहे. स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्यासह आयातीवर निर्भरता कमी करण्यासाठी अनेक पुढाकार घेण्यात आले आहेत.यासह अनेक मिसाईल बनवण्याचे काम आता देशात सुरू असल्याची माहिती देखील भट्ट यांनी दिली आहे. जगातील लष्करी साहित्यावर सर्वाधिक खर्च करणार्या देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. सैन्य साहित्य खरेदीत भारत रशिया तसेच ब्रिटेनच्याही समोर आहे.पंरतु, भारत अजूनही चीनच्या मागे आहे. चीनचे संरक्षण बजेट भारतापेक्षा चार पटीने अधिक आणि अमेरिकेपेक्षा १० पटीने अधिक आहे.

हेही वाचा :

 

 

 

 

Back to top button