Nirmala Sitharaman: टेंपल बॉर्डर असलेली लाल रंगाची साडी अन् रेड डिजिटल टॅब्लेट | पुढारी

Nirmala Sitharaman: टेंपल बॉर्डर असलेली लाल रंगाची साडी अन् रेड डिजिटल टॅब्लेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या २०२३ च्या अर्थसंकल्पावेळी पारंपरिक टेंपल बॉर्डर असलेली लाल रंगाची साडी नेसली होती. त्यांच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याचबरोबर त्यांच्या हातात असलेले लाल रंगाच्या वहिखाते असलेल्या बॉक्स फाईलने लक्ष वेधून घेतले. पेपरलेस अर्थसंकल्प असल्याने या बॉक्स फाईलमध्ये टॅबलेट होतं, ज्यामध्ये अर्थसंकल्प विषयक डेटा उपलब्ध आहे.

निर्मला सीतारमण यांची काळ्या रंगाची टेंपल बॉर्डर असलेली ही साडी त्यांच्या जुन्या लूकशी मिळतीजुळती आहे. सीतारमण यांच्याकडे बजेट बॅग वा डिजिटल वहीखाते म्हणू शकतो, अशी बॉक्स फाईल आहे. संसदेत सीतारमण यांचे टॅबलेटच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय भाषण सुरु आहे.

मागील वर्षी त्यांनी गडद ग्रे कलरची साडी नेसली होती. कोविड काळ असल्यामुळे त्यांनी मास्क लावलेला दिसत होता. ब्लॅक गोल्डन रंगाची बॉर्डर असलेली ही कॉटन साडी खास समारंभ वा कार्यक्रमासाठी नेसली जाते. या साडीवर स्टार सारखे डिझाईनदेखील आहे.

२०२१ मध्ये सीतारमण यांचे सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण

निर्मला सीतारमण यांच्या नावे सर्वात मोठं भाषण देण्याचे रेकॉर्ड आहे. त्यांनी २०२०-२१ चे अर्थसंकल्पीय भाषण २ तास ४२ मिनिटांपर्यंत सादर केलं होतं.

लाल रंग हा उत्साह, नवीन जीवनाचे प्रतीक, ऊर्जा, प्रेम, ताकद-शक्ती दर्शवतं.

कोरोना महामारी पाहता २०२१ मध्ये पहिल्यांदा संसदेत संपूर्णपणे पेपरलेस डिजिटल बजेट सादर करणाऱ्या सीतारामन पहिल्या अर्थमंत्री आहेत. अर्थसंकल्पाची कॉपी छापण्याची परंपरा बंद झाली.

 

Back to top button