स्मॅकतर्फे दोन्ही नूतन खासदारांचा उद्या सत्कार आणि मेळावा | पुढारी

स्मॅकतर्फे दोन्ही नूतन खासदारांचा उद्या सत्कार आणि मेळावा

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक)च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि धैर्यशील माने यांच्या सत्कार शनिवारी (दि.15) सायंकाळी आयेजित केला आहे. शिरोली एमआयडीसीतील स्मॅक भवन येथे हा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांचा मेळावासुद्धा आयोजित केला असल्याची माहिती स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी दिली.

पुढे सुरेंद्र जैन म्हणाले की, लोकसभेच्या निवडून आलेल्या दोन्ही खासदारांचा स्मॅकच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांचा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये उद्योजकांसमोर अनेक अडचणी सोडविण्यासाठी ‘उद्योजकांच्या समस्या उपाय आणि पुढील वाटचाल’ या विषयावर परिसंवादही होणार आहे. सत्कार समारंभासाठी सर्व उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button