कोल्हापूर : जंगली डुकराच्या शिकारी प्रकरणी एकास अटक | पुढारी

कोल्हापूर : जंगली डुकराच्या शिकारी प्रकरणी एकास अटक

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : मादळे (ता. करवीर) येथे जंगली डुकराची शिकार केल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. ही माहिती मिळताच वनपाल शैलेश शेवडे व वनरक्षक विकास घोलप यांनी घटनास्थळी धाव घेत लक्ष्मण कोरवी यांना पळून जाताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी अन्य इतर लोकांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी कोरवी यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा केल दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई गुरुप्रसाद, कमलेस पाटील, रमेश कांबळे, सुनील खोत शैलेश शेवडे यांनी केली.

Back to top button