populous nation : भारत लोकसंख्‍येत चीनला पिछाडीवर टाकणार! जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या असणारा देश बनणार : संयुक्‍त राष्‍ट्र | पुढारी

populous nation : भारत लोकसंख्‍येत चीनला पिछाडीवर टाकणार! जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या असणारा देश बनणार : संयुक्‍त राष्‍ट्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : १.४ अब्‍ज लोकसंख्‍येसह भारत याचवर्षी चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या असणारा देश होईल, असा अंदाज संयुक्‍त राष्‍ट्राने ( युनो) व्‍यक्‍त केला आहे. चीनच्‍या राष्‍ट्रीय सांख्‍यिकी विभागाने २०२२ मध्‍ये देशाची लोकसंख्‍या १.४११७५ अब्‍ज लोकसंख्‍येमध्‍ये ८५०,००० लोकसंख्‍येची घट नोंदवली गेली आहे.  त्‍यामुळे भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या असणारा देश ( populous nation)   बनेल, असे ‘रॉयटर्स’ने आपल्‍या अहवालात नमूद केले आहे. या पार्‍श्वभूमीवर जाणून घेवूया भारतीय लोकसंख्‍येबाबतचे काही महत्त्‍वाचे मुद्दे…

  • चीनच्‍या १.४ अब्‍ज लोकसंख्‍येच्‍या तुलनेत भारताची लोकसंख्‍या १.३८ अब्‍ज असल्‍याचा अंदाज आहे.
  • २३० दक्षलक्ष लोकसंख्‍य असणारे उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्‍या असणारे देशातील राज्‍य आहे.
  • केंद्रशासीत प्रदेश लक्षद्वीपची लोकसंख्‍या सर्वात कमी असून ती केवळ ६८ हजार इतकी आहे.
  • भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून देशातील २७. ३ टक्‍के लोकसंख्‍या ही १५ ते २९ वर्ष वयोगटातील आहे.
  • २०५० मध्‍ये जगातील निम्‍म्‍याहून अधिक लोकसंख्‍या वाढीस जबाबदार असणार्‍या देशांमध्‍ये भारताचा समावेश असण्‍याची शक्‍यता आहे. तसेच यामध्‍ये इजिप्त, इथिओपिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स आणि टांझानिया समावेश असेल, असे संयुक्‍त राष्‍ट्रांनी ( युनो ) म्‍हटले आहे.
  • २०११ पासून भारताची लोकसंख्‍या वाढ ही दरवर्षी सरासरी १.२ टक्‍के इतकी आहे. मागील १० वर्षांची तुलना करता ही १.७ टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाली आहे.
  • भारतात कुटुंब नियोजनाचा वापर खूपच प्रभावीपणे झाल्‍याचे सर्वेक्षणात स्‍पष्‍ट झाले आहे. २०१५-१६ मध्‍ये ५३.५ टक्‍के कुटुंब नियोजन हे २०१९-२१ मध्‍ये ६६.६७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.

populous nation :  चीन लवकरच होणार ‘वृद्धांचा देश’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वाधिक लोकसंख्‍येचा देश, असे बिरुद मिरवणार्‍या चीनची लोकसंख्‍या ६० वर्षांमध्‍ये प्रथमच घटली असल्‍याचे निदर्शना आले आहे. घटत्‍या लोकसंख्‍येमुळे जगातील सर्वाधिक वृद्धांचा देश होण्‍याच्‍या मार्गावर चीन आहे. जन्‍मदर कमी झाल्‍याने या देशाला नवीन सामाजिक समस्‍यांचाही सामना करावा लागणार आहे. ( China Population) २०३० पासून चीनची लोकसंख्‍येत उतरणील लागेल, असा अंदाज संयुक्‍त राष्‍ट्रांनी २०२१ मध्‍ये व्‍यक्‍त केला होता. मात्र सलग पाच वर्ष चीनमधील लोकसंख्‍यावाढीचा दर हा कमी नोंदला गेला आहे. तर  मृत्‍यूदर वाढला आहे. लोकसंख्‍येचे संतुलन बिघडल्‍याने चीनला आर्थिक व सामाजिक समस्‍यांना सामोर जावे लागणार आहे. तसेच कमी संख्‍येने असणार्‍या तरुणाईला काम देवून देशाचा विकासाचा टक्‍का अबाधित ठेवण्‍याचे आव्‍हानही सरकारसमोर असणार आहे.

populous nation :  तब्‍बल ४५ वर्षांनंतर चीनमध्‍ये सर्वाधिक मृत्‍यूदर

चीनमधील सांख्‍यिकी विभागाने जाहीर केलेल्‍या आकडेवारीनुसार, २००० ते २०१०मध्ये चीनमधील लोकसंख्यावाढीचा दर ०.५७ टक्के होता. गेल्या दहा वर्षांतील लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर ०.५३ टक्के असून, लोकसंख्यावाढीचा हा १९५०पासूनचा सर्वांत कमी दर नोंदला गेला होता. डिसेंबर २०२२ मध्‍ये देशाची लोकसंख्‍या १,४११७५ अब्‍ज आहे. २०२१ मध्‍ये चीनमधील जन्‍मदर १००० लोकांमध्‍ये ७.५२ मुलांचा होता. मात्र मागील वर्षी म्‍हणजे २०२२ मध्‍ये देशातील जन्‍मदर  १००० नागरिकांमागे ६.७७ मुलांपर्यंत कमी झाला आहे.  मागील वर्षी दहा लाख मुले कमी जन्‍माला आहे. कोरोना महामारीमुळे १९७६ नंतर चीनमध्‍ये प्रथमच मृत्‍यूदराचे प्रमाण वाढल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. २०२२ मध्‍ये चीनमध्‍ये ७.३७ टक्‍के मृत्‍यूदर नोंदवला गेला आहे.

 ‘एक अपत्‍य’ योजनेचा परिणाम

मागील काहीवर्ष चीनमध्‍ये अत्‍यंत कठोरपणे लोकसंख्‍या नियंत्रण धोरण राबविण्‍यात आले. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी चीन सरकारने १९७१ मध्‍ये ‘एक अपत्‍य’ योजना अत्‍यंत कठोरपणे राबवली. एकापेक्षा जास्त अपत्ये जन्माला आल्यास शिक्षेची तरतूदही करण्यात आली होती.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button