हिंदू युवकाच्या हत्येचा व्हिडीओ पाकिस्तानात पाठविला | पुढारी

हिंदू युवकाच्या हत्येचा व्हिडीओ पाकिस्तानात पाठविला

नवी दिल्ली : दिल्लीतील भलस्वा डेअरी टार्गेट किलिंग प्रकरणात रविवारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी हातावर त्रिशूळ गोंदलेल्या हिंदू युवकाची हत्या करून त्याचा 37 सेकंदांचा व्हिडीओ तयार केला व हा व्हिडीओ पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या सोहेल नावाच्या म्होरक्याला पाठवला. सोहेलला व्हिडीओ प्राप्त होताच दहशतवाद्यांच्या खात्यात कतारहून 2 लाख रुपये जमा झाले.

दहशतवाद्यांनी या युवकाचे 8 तुकडे केले होते. दहशतवाद्यांनी आधी त्याच्याशी मैत्री केली. नंतर 14 किंवा 15 डिसेंबरला त्याची हत्या केली. दिल्ली पोलिसांना दहशतवाद्यांच्या मोबाईलमध्ये या हत्येचा व्हिडीओ मिळाला आहे. अटकेतील दोन्ही दहशतवादी दिल्लीतील भलस्वा डेअरी भागात भाड्याने राहात होते. नौशाद (56) व जगजीत सिंग ऊर्फ जग्गा (29) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांना 12 जानेवारील जहाँगिरपुरीतून अटक केली होती.

Back to top button