‘आप’ची जनतेच्या पैशावर उधळपट्टी : दिल्लीत जाहिरातींवरील ९७ कोटी होणार वसुल | Aap political ads | पुढारी

'आप'ची जनतेच्या पैशावर उधळपट्टी : दिल्लीत जाहिरातींवरील ९७ कोटी होणार वसुल | Aap political ads

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने दिल्लीत जाहिरातींवर खर्च केलेले ९७ कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले आहेत. राजकीय जाहिराती सरकारी जाहिरात म्हणून प्रसिद्ध केल्याचा ठपका राज्यपालांनी ठेवला आहे. Aap political ads

Committee on Content Regulation in Government Advertising (CCRGA)चे आम आदमी पक्षाने उल्लंघन झाल्याने नायब राज्यपालांनी हे आदेश दिले आहेत. आम आदमी पक्षाने कोणकोणत्या जाहिरातीत या नियमांचे उल्लंघन केले आहे, याची चौकशी करून त्यावरील झालेला खर्च निर्धारित करण्याचे आदेश नायब राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार माहिती आणि प्रसारण संचालनालयाने सविस्तर पाहणी करून ही रक्कम ९७ कोटी १४ लाख रुपये असल्याचे निर्धारित केले. यातील रक्कम एकतर खर्च झाली आहे किंवा खर्च नियोजित आहे.

यापूर्वी डीआयपीने ‘आप’ला २०१७ साली २ कोटी २६ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते; पण ‘आप’ने याकडे साफ दुर्लक्ष केले असून अजून कोणतीही रक्कम जमा केलेली नाही.

हेही वाचा

Back to top button