केजरीवाल, सत्येंद्र जैन यांचे कारनामे उघड करू : सुकेश चंद्रशेखर | पुढारी

केजरीवाल, सत्येंद्र जैन यांचे कारनामे उघड करू : सुकेश चंद्रशेखर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचे कारनामे लवकरच आपण उघड करू, अशा आशयाचे पत्र घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याने तुरुंगातून लिहिले आहे. सुकेश याने यापूर्वीही तुरुंगातून काही पत्रे लिहून केजरीवाल आणि जैन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांत केजरीवाल यांच्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. ही केजरीवाल यांच्या राजकीय पर्वाच्या अंताची सुरुवात आहे. केजरीवाल यांनी खरे रंग दाखविल्याने लोकांनी त्यांना नाकारले आहे. केजरीवाल यांचे कारनामे आपण यापुढील काळात उघड करणार असल्याचेही त्याने पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

तुरुंगातून पत्रे लिहिण्यासाठी आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. उलट पत्रे लिहिण्यासाठी भाजपने दबाव आणला, असे सांगण्यासाठी केजरीवाल यांनी आपल्यावर दबाव टाकला होता, असेही सुकेशने सध्याच्या मिळालेल्या पत्रात म्हटले आहे. याआधीच्या पत्रांमध्ये आपण जे काही लिहिलेले आहे, ते पूर्णपणे खरे आहे, अशी टिप्पणीही सुकेशने केली आहे.

हेही वाचा:

Back to top button