केजरीवालांच्या पराभवालाही विजयाची किनार; ‘आप’ बनला नववा राष्ट्रीय पक्ष, केवळ घोषणा बाकी | पुढारी

केजरीवालांच्या पराभवालाही विजयाची किनार; 'आप' बनला नववा राष्ट्रीय पक्ष, केवळ घोषणा बाकी

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्‍तसेवा : दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्‍वाखालील आम आदमी पार्टीला दुहेरी फायदा झाला आहे. भलेही आम आदमी पार्टी जरी आज (गुरूवार) गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात मागे पडल्‍याची दिसली तरी. ज्‍यावरून दोन्हीही राज्‍यात पक्षाचा पराभव होणार हे नक्‍की आहे. असे असतानाही दुसऱ्या बाजुला आम आदमी पार्टीने मैलाचा दगड ठरेल असे यश संपादन केले आहे. आपने राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे. ज्‍यानंतर देशात राष्‍ट्रीय पक्षांची संख्या वाढून नऊ इतकी होणार आहे.

आम आदमी पक्षाने गुजरातच्या निवडणुकीमध्ये १३ टक्‍के मते मिळवली आहेत. त्‍यामुळे आप हा गुजरातमध्ये स्‍थानिक पक्ष आणि राष्‍ट्रीय पक्ष बनला आहे. याची घोषणा नंतर निवडणूक आयोगाकडून केली जाईल.

त्‍यातच एक दिवस आधी आम आदमी पार्टीने दिल्‍ली महापालिकेत विजय संपादित केला. आपने या निवडणुकीत (बुधवारी) १३४ जागा जिंकत भाजपच्या १५ वर्षाच्या एकहाती सत्‍तेला पराभूत केले. मनपाच्या २५० वार्डांच्या झालेल्‍या निवडणुकीत भाजपला १०४ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसच्या वाट्याला फक्‍त नऊ जागा आल्‍या.

संबंधित बातम्या

देशात राजकीय पक्ष किती आहेत? 

निवडणूक आयोगाच्या अनुसार काँग्रेस, भाजप, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय आणि एनपीपी हे राष्‍ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा २०१९ मध्ये मिळाला. आम आदमी पार्टीने दिल्‍ली, पंजाब आणि गोव्यात राज्‍य स्‍तरावरील पक्ष म्‍हणजे स्‍थानिक पक्षाचा दर्जा मिळवला आहे.

राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी यातील एक अट पूर्ण करणे जरूरीचे.. 

Back to top button