हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांना कोरोनाची लागण | पुढारी

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांना कोरोनाची लागण झाली असून पुढील तीन दिवस ते दिल्लीतील हिमाचल भवनमध्ये क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गळ्यात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर सुक्खू यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे त्यांची पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची भेटही लांबणीवर पडली आहे. हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ सुक्खू यांच्या गळ्यात पडली होती.

हेही वाचा :

Back to top button