मुलींची छेड काढणार्‍यांना ठार मारले जाईल : योगी आदित्यनाथ | पुढारी

मुलींची छेड काढणार्‍यांना ठार मारले जाईल : योगी आदित्यनाथ

कानपूर : एखाद्या गुंडाने एका चौकात माता-भगिनींची छेड काढली, तर दुसर्‍या चौकात पोहोचेपर्यंत पोलिस त्याला ठार करतील, असा निर्वाणीचा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना दिला आहे. ते शुक्रवारी कानपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

योगी म्हणाले, एखादा गुंड एका चौकात माता-भगिनींची छेड काढतो. दुसर्‍या चौकात दरोडा टाकण्याचे धाडस करतो. मात्र, आता असे होणार नाही. कारण, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत त्याची प्रत्येक हालचाल कैद होईल. त्यामुळे यापुढे कुणी एका चौकात छेड काढली किंवा दरोडा टाकला, तर पुढल्या चौकात पळून जाण्यापूर्वीच पोलिस त्याला ठार मारतील. महिला शक्तीची अवहेलना सरकार अजिबात खपवून घेणार नाही. त्यामुळे गुंडापुंडांनी वेळीच याचा विचार केलेला बरा.

Back to top button