MCD Election : आम आदमी पार्टीची जाहीरनाम्याची घोषणा | पुढारी

MCD Election : आम आदमी पार्टीची जाहीरनाम्याची घोषणा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजन अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली महानगर पालिका निवडणुकीसाठी ( MCD Election)  जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पर्यावरण मंत्री गोपाल राय यावेळी उपस्थित होते.

केजरीवाल यांनी यावेळी भाजपवर शरसंधान साधले. भाजप पक्ष केवळ खोटं बोलतो. गेल्या निवडणुकीत त्यांनी शपथपत्र जाहीर केले होते. पंरतु, कुठलेही काम केली नाहीत. यावेळी वचनपत्र जाहीर करीत भाजप दिल्लीकरांची दिशाभूल करीत आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत  (MCD Election) भाजपला केवळ २० जागा मिळतील, असा दावा केजरीवाल यांनी केला.

दिल्लीला कचरामुक्त करण्यासह भष्ट्राचार मुक्त दिल्ली महानगर पालिका एमसीडी, पार्किंगच्या समस्येतून मुक्तता, मोकाट जनावरांच्या समस्येतून दिल्लीकरांची सुटका करण्याची हमी केजरीवाल यांनी दिली आहे. याशिवाय रस्ते आणि गल्लीबोळात पक्के रस्ते बांधणे, दिल्ली महानगर पालिकेच्या डिस्पेंसरीत सुधारणा, दिल्लीला ‘पार्कांचे’ शहर बनवण्याचा मानस केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासह सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आश्वासन आपने दिले आहे. दिल्लीचे व्यापारी पालिकेच्या नियमांमुळे त्रस्त आहेत. अशात सत्तेवर येतात यासंबंधी धोरण बनवून इंस्पेक्टर राज संपुष्टात आणणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. फेरीवाल्यांसाठी विशेष झोन तयार करून त्यांना परवाने देण्यात येतील, असे आश्वासन आपने दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button