Earthquake : अरुणाचल प्रदेशात 5.7 तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Earthquake : अरुणाचल प्रदेशात 5.7 तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : अरुणाचलमधील वेस्ट सिआंग येथे 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता हा भूकंप झाला असून जमिनीखाली 10 किलोमीटरपर्यंत भूकंपाची खोली होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजी यांनी दिली आहे. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीचे आज वृत्त नाही.

Earthquake : हिमालय पर्वताच्या प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सतत भूकंप होत आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी रात्री नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्री दोन वाजता, दिल्ली, एनसीआर, उत्तरप्रदेशात भूकंपाचे धक्के बसले. तर उत्तराखंडातील पिथोरागढ या ठिकाणी सकाळी साडेसहा वाजता भूकंप झाला. या सर्व भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळ होते.

हे ही वाचा :

अखेर संजय राऊत मीडियासमोर आले, कुणावरही टीका नाही, फडणवीसांच्या निर्णयाचे केले कौतुक

Earthquake : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआर, युपीसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, रात्रीपासून सकाळपर्यंत भूकंपाचे तीन वेळा धक्के

 

Back to top button