Earthquake : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआर, युपीसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, रात्रीपासून सकाळपर्यंत भूकंपाचे तीन वेळा धक्के | पुढारी

Earthquake : नेपाळमधील मोठ्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआर, युपीसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के, रात्रीपासून सकाळपर्यंत भूकंपाचे तीन वेळा धक्के

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : नेपाळमध्ये काल मंगळवारी रात्री 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर कालरात्रीपासून सकाळपर्यंत दिल्ली-एनसीआर, उत्तरप्रदेशातील अनेक ठिकाणी रात्री दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. तर आज बुधवारी सकाळी 6.27 मिनिटांनी 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सिसमॉलॉजी सेंटरने याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

Earthquake : नेपाळमध्ये दौती जिल्ह्यात भूकंपामुळे एक संपूर्ण घर कोसळले त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. नेपाळमधील भूकंपाचे झटके दिल्ली-एनसीआर आणि उत्तरप्रदेशातील काही ठिकाणी जाणवले. त्यानंतर 5 तासाच्या अंतराने पुन्हा एकदा दिल्ली-एनसीआरसह, उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी रात्री दोन वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र या भूकंपाचे केंद्रस्थान हे नेपाळच होते. दरम्यान नेपाळच्या बचाव कार्य सुरू झाले आहे.

Earthquake : तर आज बुधवारी सकाळी उत्तराखंडात 6.27 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 4.3 तीव्रतेचा होता. जमिनीखाली 5 किलोमीटर इतकी याची खोली होती. सुदैवाने भारतात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

हे ही वाचा :

Uttarakhand earthquake : टिहरी येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप

Earthquake in MP : मध्य प्रदेश, छत्तीसगड भूकंपाने हादरले

Back to top button