Bihar witch hunt : जादुटोण्याच्या संशयातून ‘डायन’ ठरवलं अन् महिलेला जिवंत जाळलं | पुढारी

Bihar witch hunt : जादुटोण्याच्या संशयातून 'डायन' ठरवलं अन् महिलेला जिवंत जाळलं

पुढारी ऑनलाईन डेस्क :  जादुटोणाच्या संशयातून एका महिलेला ‘डायन’ ठरवत महिलेले घरात घुसून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. मदतीसाठी बोलावण्यात आलेल्या पोलिसांवर दगडफेक करून त्यांना माघारी जाण्यास भाग पाडण्यात आले. ही धक्कादायक घटना घडली आहे बिहार (Bihar witch hunt ) राज्यातील गया जिल्ह्यात. या घटनेतील महिला ही अनुसुचित जातीमधील असून (Scheduled Caste-SC)  घटना शनिवारी (दि. ५) नोव्हेंबर रोजी घडली.
याप्रकरणी कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब घेतले असून, आतापर्यंत 68 आरोपींची ओळख पटली  असून 14 जणांना आधीच अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील कुटुंबाला सुरक्षा देण्यात आली असून त्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. असं एसएसपी हरप्रीत कौर यांनी माध्यमांना सांगितले आहे.
Bihar witch hunt
Bihar witch hunt

Bihar witch hunt : रिताने जादूटोणा केला?

Bihar witch hunt माहितीनुसार ही धक्कादायक घटना  मैगरा पोलिस दुर्गम डोंगराळ भागात घडली आहे. सदर महिलेचे नाव रिता देवी (वय.४५) असून तिच्या पतीचे नाव अर्जुन दास आहे. घटनास्थळी महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर स्थानिकांनी हल्ला करून त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. घटना अशी की  एक महिन्यापूर्वी  गावातील परमेश्वर भुईया यांचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. परमेश्वर भुईया यांच्या कुटुंबियांचे असे मत होते की रिता देवीने जादूटोणा करून त्यांची हत्या केली. रिता ही दास समुदायातील आहे तर परमेश्वर हे भुईया या समुदायातील आहेत. दोघांचे कुटुंब आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक याचंं परमेश्वर यांच्या मृर्त्यूनंतर भांडण सुरू आहेत.

घरात कोंडून जिवंत जाळले

परमेश्वरच्या कुटुंबीयांनी शनिवारी, (दि.५ नोव्हेंबर) झारखंडमधील एका जादुटोणा करणाऱ्याला बोलावले होते. त्याने दुपारी बोलावलेल्या पंचायतीसमोर रिता दास हिने जादूटोणा वापरून परमेश्वर यांच्या हत्येची कबुली दिल्याचा दावा केला. मात्र, तणावाचं वातावरण आणि हाणामारी होण्याची शक्यता पाहून जादुटोणा करणारा पळून गेला. रिता दास आणि तिचे कुटुंबीयही घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, परमेश्वर यांचे कुटुंबीय आणि भुईया समाजाच्या लोकांनी शस्त्रे घेऊन रिता दास हिच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर दास कुटुंबातील माणसे जवळच्या जंगलात पसार झाली. पुन्हा जमावाने रिता हिची खोली फोडली आणि बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. तिच्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या अंगावर  पेट्रोल ओतले आणि  घराला आग लावली. यात रिता हिचा मृत्यू झाला.
तिचा पती आणि दोन्ही मुलांनी तात्काळ पोसिस स्टेशनला धाव घेतली. तात्काळ पोलिस घटनास्थळी आले पण जमावाने त्यांना दगडांनी हल्ला केला आणि माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर एसडीपीओ (SDPO) मनोज राम यांच्या नेतृत्वाखाली पुरेशा महिला कॉन्स्टेबलसह मोठा फौजफाटा घेऊन संध्याकाळी गावात घटनास्थळी प्रवेश केला. सदर प्ररकरणातील संशयितांना अटक केले. 
घटनेनंतर इमामगंज एसडीपीओ मनोज राम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस मृतदेह शोधण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गया येथे पाठवण्यात आला. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code -IPC) च्या कलम ३०२ आणि ४३६ आणि जादुटोणा कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे (FSL) एक पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसरातील नमुने गोळा केले आहेत.

हेही वाचा

 

Back to top button