पुढारी ऑनलीन डेस्क : सध्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये 52 वर्षाच्या राहुल गांधींचे धावतानाचे, वेगाने चलतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कित्तेक आठवडे दररोज 25 किलीमोटरहून अधिक चालणे, कार्यकर्ते-नेते आणि जनतेशी संवाद साधणे यासाठी शरीर आणि मन तंदुरुस्त असणे गरजेचे असते. दरम्यान त्यांचे 10 सेकंदात 14 पुशअप्स मारलेला व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत होता. या सर्व गोष्टींवरून राहुल गांधींच्या फिटनेसबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. कर्नाटकमधील पदयात्रेमध्ये गांधी कमांडोसोबतच नव्हे तर त्यांच्याही पुढे धावल्याचे काही चाहत्यांकडून लिहिण्यात आले होते. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या फिटनेसबद्दल…
राहुल गांधी जपानी मार्शल आर्ट 'ऐकिडो' चे Aikido ट्रेनिंग घेतेलेले व्यक्ती असून 'ऐकिडो' एक असा मार्शल आर्ट प्रकार आहे, ज्यामध्ये हत्याराविना शत्रूला परास्त करण्याची कला शिकवली जाते. ही कला शिकण्यामध्ये शरीरक क्षमतेसोबत मानसिक क्षतेचाही कस लागत असतो. राहुल गांधींनी 'ऐकिडो'चे संपूर्ण प्रशिक्षण घेतले असून त्यासोबत ते दररोज जीमही करतात. गांधींना सायकलिंग, स्विमिंग, स्कुबा डायव्हिंग याचीही आवड आहे.
राहुल गांधी वर्कआउट सोबत डायटसुद्धा कटाक्षाने पाळतात. ते सकाळी नाश्त्यामध्ये इडली सांबर, डोसा, ड्राय फुड्स खाण्याला प्राधान्य देतात. ते नाश्ता हलकाफुलका करतात तसेच ते लेमन ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक्स घेतात. यानंतर भाजी-रोटी, भात-आमटी असे साधे जेवण घेतात. यासोबत साऊथ इंडियन जेवण, भारतीय किनारी मांसाहारी जेवण याचेही ते चाहते आहेत. ते चॉकलेटचे मोठे शौकीन असून भटकंती हा त्यांचा छंद आहे.
1. ध्यान: केवळ राहुलच नाही तर संपूर्ण गांधी कुटुंबाला ध्यानाची आवड आहे. सूत्रांनुसार, राहुल अध्यात्मावर विश्वास ठेवतात, ते अनेकदा विविध ध्यान संस्थांना भेट देत असल्याचे आपण पाहिले आहे. ध्यान हा ज्ञानप्राप्तीचा एक मार्ग आहे. ध्यान तुमच्या शरीरावर आणि आत्म्यावर शांत आणि सुखदायक प्रभाव देते, असा विश्वास त्यांचा आहे.
2. जॉगिंग : राहुल गांधी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून प्रत्येक दिवशी १२ किमी धावतात. आपल्या दैनंदिन वेळापत्रक सांभाळत जॉगिंग आणि धावण्याची आवड जोपासतात.
3. योग: राहुल गांधी यांना जॉगिंग, व्यायामसोबत योगाचीही आवड आहे. योगाचे ते अनुयायी आहेत. आपल्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये ते योगालाही महत्त्वाचे स्थान देतात. फिटनेस कल्चर विकसित करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई शहरात राहुल गांधी मुक्कामाला असताना ते मध्यरात्री सुमारे एक तास जॉगिंग करत असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते श्रीनगर अशी 3,570 किलोमीटरची भारत जोडो यात्रा 150 दिवस सुरू राहणार आहे. ७ सप्टेंबरला सुरू झालेल्या या यात्रेत दररोज २२ ते २५ किलोमीटरची पायपीट राहुल गांधी आपल्या सहकाऱ्यासोबत करत आहेत. या दरम्यान, त्यांच्या दिवसाची सुरूवात पहाटे ४.३० वाजता होते.
हे वचलंत का?