UP Accident : अमरोहा येथे ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, 4 जण जागीच ठार | पुढारी

UP Accident : अमरोहा येथे ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, 4 जण जागीच ठार

पुढारी ऑनलाइन डेस्क : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात एका ऑटो रिक्षाचा भीषण अपघात घडला. रिक्षेला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ज्यामध्ये रिक्षातील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

जिल्ह्यातील गजरौला थाना या भागात ही घटना घडली. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांच्या आणि जखमीच्या नातेवाईकांना सूचना दिल्या आहेत. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

अमरोहाचे पोलिस अधीक्षक आदित्य लांग्हे यांनी सांगितले की आम्ही कारवाई सुरू केली आहे. त्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्यात येत आहे.

हे ही वाचा :

पोफळीतील वीज प्रकल्प सर्जवेलला गळती … पाच वर्षे धूळ खातोय दुरुस्तीचा प्रस्ताव 

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ऑनलाईन अर्जांची होणार खातरजमा..!

Back to top button