राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणीची शक्यता | पुढारी

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणीची शक्यता

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी (दि. 1) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या सुनावणीत घटनापीठाने खरी शिवसेना कोणाची? याचा निवाडा निवडणूक आयोग करेल, असे स्पष्ट करीत बंडखोर शिंदे गटाला दिलासा दिला होता. परंतु, आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयाने कुठलेही निर्देश दिले नव्हते. अशात आज होणार्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यापासून आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. न्यायालयाने निवडणूक आयोगाला यासंबंधी कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश दिले होते. याही निर्णयावर स्थापन केलेल्या घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घातलेली बंदी उठवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आज, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button