

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी अशा व्यक्तीशी ईर्ष्या करेन जो २०४७ मध्ये परराष्ट्र मंत्री असेल, असे विधान परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी रविवारी ( दि. ४) गुजरातमधील एका कार्यक्रमात केले. जयशंकर यांच्या 'द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर एन अनसर्टेन वर्ल्ड' पुस्तकाच्या गुजरातील भाषेतील अनुवादाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य केले. जाणून घेवूया पराराष्ट्र मंत्री नेमकं असे का म्हणाले या विषयी…
या वेळी जयशंकर म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असणे हीच एक मोठी ताकद आहे. भारताचा विश्वास, आत्मविश्वास आणि दृष्टिकोन याची आता जगाला ओळख झाली आहे. २०४७ मध्ये भारत हा एक विकसित देश असेल. विकसित देशाचे परराष्ट्र मंत्री होणे ही एक मोठी बाब असते. त्यामुळेच मी अशा व्यक्तीशी ईर्ष्या करेन जो २०४७ मध्ये भारताचा परराष्ट्र मंत्री असेल".
भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, "अमेरिकेला गुंतवणूक ठेवणे, चीनशी योग्य व्यवस्थापन राखणे आणि रशियाला आश्वस्त करणे हे भारताच्या पराराष्ट्र धोरणाचा 'सबका साथ सबका विकास' आहे." आपण जेव्हा समुद्री सीमांचा विचार करतो तेव्हा हिंद महासागरबाबत प्रथम विचार करतो. तसेच ही वस्तुस्थिती आहे की, जगातील अन्य देशांच्या समस्यांमध्ये हस्तक्षेप न करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. आपल्याकडे आत्मविश्वास असणारा अभावामुळे अडथळे येत आहेत. भारताच्या लोकसंख्या जन्मदर कमी होत आहे. त्यामुळे शिक्षण, सामाजिक जागरुकता आणि समृद्धि वाढत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
१९५० ने ६० या दशकामध्ये आपल्या देशाची क्षमता कमी होती. हे आपल्या हिताचे नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वीच आपला देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश झाला आहे. त्यामुळे २० व्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था असणारा देश आणि पाचव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था असणारा देश यांचे विचार एकसारखे असूच शकत नाहीत. आता आपल्याला आपल्या क्षमतेनुसार बदलले पाहिजे. आपल्या आता आत्मविश्वास दाखवावा लागेल. आपल्याकडे आत्मविश्वासाचा अभाव आहे. आज आपण या स्तरावर आहोत की, आपल्याला आपल्या हितांसाठी शक्य तेवढे सर्वांशी संबंध ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.