‘यूपीए’चे 32 आमदार रांचीहून एअरलिफ्ट | पुढारी

‘यूपीए’चे 32 आमदार रांचीहून एअरलिफ्ट

रांची; वृत्तसंस्था :  झारखंडमधील ‘यूपीए’च्या (काँग्रेस – जेएमएम आणि आरजेडी) 32 आमदारांना एअरलिफ्ट करण्यात येऊन रांचीहून रायपूरला नेण्यात आले आहे. रायपूरला दोन दिवसांची बुकिंग रिसॉर्टमध्ये केली आहे.

विमानतळाबाहेर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. रांची विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. रायपूर विमानतळावरही आमदारांच्या आगमनानिमित्त सुरक्षा व्यवस्था कडक होती. आमदारांना विमानतळावरून बसमधून नवा रायपूर येथील मेफेअर रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. एअरलिफ्ट आमदारांमध्ये काँग्रेसचे 12, झामुमोचे 19 आणि आरजेडीच्या 1 आमदाराचा समावेश आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यानी 1 सप्टेबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्यात अनेक महत्वाचे निर्णय शक्य आहेत. राजकीय संघर्षात हेमंत सोरेन यांचे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता असून असे घडले तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची नियुक्‍ती होईल, असे सांगण्यात येते.

Back to top button