बिग बॉस १७ नंतर अंकिता लोखंडे-विकी जैन लाफ्टर शेफमध्ये एकत्र | पुढारी

बिग बॉस १७ नंतर अंकिता लोखंडे-विकी जैन लाफ्टर शेफमध्ये एकत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ मधील कमालीच्या परफॉर्मन्स नंतर पॉवर कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुन्हा एकदा टेलिव्हिजन वर दिसणार आहेत. हे जोडपे ‘लाफ्टर शेफ’ नावाच्या आणखी एका रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे, ज्यामध्ये ते त्यांचे स्वयंपाकाचे कौशल्य तसेच कॉमिक टाईमिंग यांची जुगलबंदी साधताना दिसणार आहेत. भारती सिंग आणि शेफ हरपाल सिंग सोखी यांनी होस्ट केलेला हा शो प्रेक्षकांसाठी हास्याचा एक परिपूर्ण डोस असून आता यात अंकिता विकी देखील दिसणार आहेत.

अंकिता आणि विकीच्या डायनॅमिक जोडी ने बिग बॉस १७ मधील प्रेक्षकांची मने जिंकली. आता ते या शोमध्ये काय मज्जा घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. वर्क फ्रंटवर, पॉवर कपल ‘ला पिला दे शराब’ नावाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये शेवटचे एकत्र दिसले होते.

अंकिता सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या बॉक्स-ऑफिसवर यश मिळवत आहे ज्यासाठी तिने यमुनाबाईच्या भूमिकेसाठी तिच्या अभिनयाची प्रशंसा केली. ती पुढे संदीप सिंगच्या ‘आम्रपाली’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे जिथे ती प्रसिद्ध शाही गणिकेची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अधिक वाचा-

Back to top button