IPL 2024 : ‘आरसीबी’च्‍या पराभवावर विराटची पहिली प्रतिक्रिया, “मी आयुष्‍यभर….” | पुढारी

IPL 2024 : 'आरसीबी'च्‍या पराभवावर विराटची पहिली प्रतिक्रिया, "मी आयुष्‍यभर...."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएलमधील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्‍यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) पराभव झाला. या पुराभवामुळे विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्‍याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगलं आहे. या सामन्‍यानंतर विराट कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी खेळायला सुरुवात केली…

कोहलीने ‘आरसीबी’च्या सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “यंदाच्‍या आयपीएल स्‍पर्धेत आम्‍ही स्पर्धेतून बाहेर पडलो होतो. पहिल्या 7 सामन्यांमध्ये आमची कामगिरी अजिबात चांगली नव्हती. मात्र त्यानंतर आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी खेळायला सुरुवात केली आणि व्यक्त झालो. आम्ही ज्या पद्धतीने पुनरागमन केले आणि प्लेऑफमध्ये पोहोचलो. यामुळे आमचा आत्मविश्वास परत आला. आम्ही ज्या प्रकारे प्लेऑफसाठी पात्र ठरलो ते खूप खास होते आणि मी ते आयुष्यभर लक्षात ठेवेन. संघातील प्रत्येक सदस्याने यासाठी योग्‍य दिलं याचा मला पुरेपूर अभिमान आहे.”

राजस्‍थानने ‘आरसीबी’चा केला ४ गडी राखून पराभव

आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य 19 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले.या पराभवामुळे आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडला आणि आयपीएल ट्रॉफी आणखी एका हंगामासाठी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

दुसर्‍या क्वालिफायर सामन्यात राजस्‍थान भिडणार  सनरायझर्स हैदराबादशी

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने पुढील फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत धडक मारणार आहे. यंदाच्‍या आयपीएल हंमागातील अंतिम सामना २६ मे रोजी होणार असून. हैदराबादचा पराभव करुन कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button