पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑगस्टला होणार नीती आयोगाची बैठक | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑगस्टला होणार नीती आयोगाची बैठक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 7 ऑगस्ट रोजी नीती आयोगाची प्रशासकीय परिषदेची बैठक होणार असल्याची माहिती आज ( दि. २७) सूत्रांनी दिली. कृषी, आरोग्य तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

प्रशासकीय परिषद हे नीती आयोगाचे धोरण निर्धारण मंडळ आहे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री हे परिषदेचे सदस्य असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. केंद्रात सर्वप्रथम मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये प्रशासकीय परिषदेची पहिली बैठक झाली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button