पी. टी. उषा, ईलाइराजा, वीरेंद्र हेगडे, व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभेवर संधी | पुढारी

पी. टी. उषा, ईलाइराजा, वीरेंद्र हेगडे, व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभेवर संधी

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : प्रसिध्द संगीतकार ईलाइराजा, माजी धावपटू पी. टी. उषा, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हेगडे तसेच चित्रपट निर्माते व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारही मान्यवरांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.

धावपटू पी. टी. उषा यांनी एककाळ गाजवत भारतीय क्रीडा क्षेत्राला नवी दिशा दिली होती. गेल्या काही दशकांपासून त्या युवकांना प्रशिक्षण देत त्यांचे करियर घडवीत आहेत. ईलाइराजा हे प्रख्यात संगीतकार असून देश-विदेशात त्यांचे चाहते आहेत. कित्येक दशकांपासून ते संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. विजयेंद्र प्रसाद यांनी चित्रपट क्षेत्रात अनमोल योगदान दिलेले आहे तर वीरेंद्र हेगडे यांची सामाजिक क्षेत्रातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. वरील चारही मान्यवरांच्या त्या-त्या क्षेत्रातील अनुभवाचा लाभ राज्यसभेच्या माध्यमातून देशाला होईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button