काश्‍मीरमध्‍ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा | पुढारी

काश्‍मीरमध्‍ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
जम्‍मू-काश्‍मीरमधील कुपवाडा आणि कुलगाम येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्‍ये चकमक झाली. यामध्‍ये कुपवाडामध्‍ये झालेल्‍या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यात सुरक्षा दलाच्‍या जवानांना यश आले. कुपवाडा पोलिस आणि २८ आरआर दलाचे जवानांनी संयुक्‍तपणे ही कारवाई केली.

कुपवाडामधील लोलाब परिसरात दहशतवाद्यांचा आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. कुपवाडा पोलिस आणि २८ आरआर दलाच्‍या जवानांनी शोध मोहिम राबवली. या वेळी दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. याला जवानांनी चोख प्रत्‍युत्तर दिले. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात शोध मोहिम सायंकाळपर्यंत सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्‍यान, कुलगाममधील डीएच पोरा परिसरातही सुरक्षा दलाच्‍या जवान आणि दहशतवाद्यांमध्‍ये चकमक झाली. या परिसराला जवानांनी वेढा दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button