काही माणसांच्या बाबतीत असं होत की, काळ आला होता; पण वेळ आली नव्हती. असच काहीसं उत्तर प्रदेशच्या एका वृध्देच्या बाबतीत घडलं. सोशल मीडियावर ललितपूर स्टेशनवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Viral Video) यामध्ये दिसत आहे की, रेल्वे पोलिस दलाचा जवान पाठीमागून येणारी रेल्वे पाहून रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृध्देला मागे जाण्यास सांगत आहे; पण रेल्वेचा भरधाव वेग पाहता त्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत आपला जीव धोक्यात घालून त्या महिलेला प्राण वाचवले.