भेटायचे असेल, तर मोबाईल बाहेर काढून ठेवा; केडगाव मुख्य कार्यकारी अभियंत्याचा फतवा | पुढारी

भेटायचे असेल, तर मोबाईल बाहेर काढून ठेवा; केडगाव मुख्य कार्यकारी अभियंत्याचा फतवा

राहू : पुढारी वृत्तसेवा: महावितरणच्या केडगाव विभागीय कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना भेटायचे असेल, तर मोबाईल बाहेर काढून ठेवावा लागतो; अन्यथा भेटू दिले जात नाही. या फतव्याबाबत शेतकरी व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे मर्जीतील ठेकेदारांना नियम व बंधन नाही.

सरकारी अथवा खासगी कार्यालयांमध्ये तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा किंवा मोबाईल वापरू नका, अशा आशयाच्या सूचना असतात. मात्र, केडगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना कामानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी अथवा इतर अभ्यांगताना मोबाईल बाहेर काढून ठेवावा लागतो. तशा सूचनाच या कायार्लयातील कर्मचारी देतात.

Ranji Trophy : मुंबईने गाठली फायनल

या सूचनांचे पालन नागरिक करीत असले तरी मुळातच मुख्य कार्यकारी अभियंता यांना सर्वसामान्य शेतकरीवर्गाच्या मोबाईलची एवढी भीती वाटतेच कशाला, असा सवाल शेतकरी व इतर नागरिकांनी विचारला आहे. याबाबत रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता

ते म्हणाले की, शेतकर्‍यांना मोबाईल कार्यालयाबाहेर काढून ठेवायला लावणे ही चूक आहे. हा नागरिकांच्या स्वातंत्र्यावरच घाला आहे. महावितरणचा ठेकेदारांना वेगळा नियम व सर्वसामान्यांना वेगळा नियम लावणे चुकीचे आहे. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा

चाकण : मंत्रालयासमोर हुतात्मा राजगुरूंचा पुतळा

‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीम; कृषी संचालक विकास पाटील यांची माहिती

रत्नागिरी : जि.प.ची रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाच गायब

Back to top button