बिहारमधील गंगापात्रात मृतदेहांचा खच | पुढारी | पुढारी

बिहारमधील गंगापात्रात मृतदेहांचा खच | पुढारी

पाटना : पुढारी ऑनलाईन 

बिहारमधील बक्सरमद्ये गंगेच्या खोऱ्यात आज ( दि. १० ) सकाळी वाहून आलेल्या मृतदेहांचा खच पडला होता. जवळपास ४० ते ४५ मृतदेह चाऊसा शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावर तरंगत असल्याचे विदारक दृष्य आज सकाळी पाहण्यास मिळाले. हे शहर बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्या सीमवेर वसलेले आहे. दिवसभरात अनेक मृतदेह या शहरातील नदीपात्रात वाहून आले. गेल्या काही दिवसांपासून हे सत्र सुरुच आहे. आतापर्यंत या भागात शेकडो मृतदेह वाहत आले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोक घाबरले आहेत. 

स्थानिक लोकांची सकाळ नदी पात्रातील मृतदेहांच्या दृष्यांनी सुरु झाली. त्यानंतर स्थनिकांनी स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. प्रशासनाच्या अंदाजानुसार हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आले आहेत आणि हे कोरोना बाधित मृतदेह आहेत. त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यावर अंत्यविधी करण्याची जागा मिळाली नसल्याची शक्याता आहे. 

चाऊसामधील शासकीय अधिकारी अशोक कुमार जे महादेव घाट येथे वाहून आलेल्या मृतदेहांच्या ठिकाणी उभे होते. त्यांनी सांगितले की आम्हाला ४० चे ४५ मृतदेह तरंगताना दिसले. त्यांनी सांगितले की हे मृतदेह नदीत टाकले असण्याची दाट शक्यता आहे. 

दुसरे शासकीय अधिकारी के.के. उपाध्याय यांनी ‘हे मृतदेह फुगले होते त्यामुळे ते निदान चार ते पाच दिवस पाण्यात असणार. ते मृतदेह उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत याचा आम्हाला शोध घ्यायला हावा.’ असे सांगितले. 

दरम्यान, शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून  या मृतदेहांपासून आणि नदीच्या पाण्यातून संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक गावकरी नरेंद्र कुमार यांनी ‘लोकांना कोरोना होईल अशी भीती वाटत आहे. आम्हाला या मृतदेहांची विल्हेवाट लावायला हवी.’ अशी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की ‘जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आले आणि त्यांनी हे मृतदेह पुरण्यासाठी ५०० रुपये देऊ केले.’ या वाहत आलेल्या मृतदेहांवरुन उत्तर प्रदेश आणि बिहार आता एकमेकांना दोष देत आहे. 

Back to top button