‘कुव्वत-उल-इस्लाम’बाबत विष्णु जैन यांच्‍या याचिकेवर २४ राेजी सुनावणी | पुढारी

'कुव्वत-उल-इस्लाम'बाबत विष्णु जैन यांच्‍या याचिकेवर २४ राेजी सुनावणी

नवी दिल्ली, १७ मे, पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीतील कुतुबमिनार परिसरात असलेल्या ‘कुव्वत-उल-इस्लाम’ मशिदीमध्‍ये हिंदू देवी-देवतांची पुनर्स्थापना करीत,
पूजाअर्चेच्या अधिकाराची मागणी करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी (दि.१७) साकेत न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार होती. पंरतु, याचिकाकर्त्याचे वकील गैरहजर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता याप्रकरणी २४ मे रोजी सुनावणी घेण्यात येईल.

यासंबंधी भारतीय पुरातत्व विभागाकडून (एएसआय) न्यायालयाने उत्तर मागितले होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पुजा तलवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ११ मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. केंद्र सरकार, संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून एएसआय महासंचालक, दिल्ली क्षेत्राचे अधिक्षक, पुरातत्व विभागाला नोटीस बजावले असल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील विष्णु जैन यांनी दिली होती. डिसेंबर २०२१ मध्ये न्यायदंडाधिकारी न्यायालयाने खटला फेटाळला होता. न्यायालयाच्या या निर्णयाला साकेत न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

न्यायालयाने जैन यांच्यावतीने दाखल करण्यात आलेली याचिका स्वीकारत संबंधित विभागांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. मोहम्मद घोरीचा प्रमुख कुतुबुद्दीन ऐबक यांनी २७ मंदिरांची आंशिक तोडफोन करीत परिसरात कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद बनवली होती, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. अशात एएसआय कडून सादर करण्यात आलेले उत्तर तसेच न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button